छेड काढणाऱ्या तरूणाचे डोंबिवलीमध्ये गुप्तांगच कापले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

एक तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर वारंवार मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करतो म्हणून एका संतप्त महिलेने या तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 25) रात्री घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

डोंबिवली : एक तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर वारंवार मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करतो म्हणून एका संतप्त महिलेने या तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 25) रात्री घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेत तुषार पुजारे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ला करणारी महिला डोंबिवलीतील नांदीवली गावात राहते.

तरुणाच्या त्रासाला कंटाळून या महिलेने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. यासाठी तिने याच परिसरातील एका मोकळ्या निर्जन स्थळी त्याला बोलावले व आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तरुणाचे गुप्तांग कापले.

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणाला उपचारासाठी  रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर अधिक तपास करत याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह मित्र प्रतीक केनिया आणि तेजस म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.  या दोघानाही बुधवारी दुपारी कल्याण सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान , जखमी तरुणाची  स्थिती गंभीर  असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Woman cuts Off boy s Penis In Dombivali