हनिमूनच्या वेळीही बॉयफ्रेंडसोबत... पतीच्या समलैंगिक संबंधामुळे पत्नी भडकली

मित्रांसोबत समलैंगिक संबंध असलेल्या तरुणाने विवाह करून आपली फसवणूक केल्याची तक्रार महिलेने पोलिसांत दिली.
gay love
gay love

नवी मुंबई : मित्रांसोबत समलैंगिक संबंध असलेल्या तरुणाने विवाह करून आपली फसवणूक केल्याची तक्रार महिलेने पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला (वय २९) व तिचा पती (वय ३२) ऐरोलीत राहण्यास आहेत. वर्षभरापूर्वी तरुणाच्या वडिलांनी वधू-वर मंडळामधून तरुणीची लग्नासाठी निवड केली होती. त्यानंतर तरुणीने तिच्यासोबत लग्न करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीसोबत बोलण्यास व भेटण्यास सुरुवात केली. त्या वेळी या व्यक्तीने त्याचे मित्र उमेश शहा (वय ६०), अक्षय शहा (४५) यांच्याबद्दल सांगितले होते.

तसेच जीवनात सर्व गोष्टी त्यांना विचारून करत असल्याचे तरुणीला सांगितलं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणीला आपल्या पतीबाबत संशय आल्याने तिने पतीच्या मोबाईल फोनची तपासणी केल्यानंतर तो समलैंगिक संबंधात असल्याचं आढळून आलं.

हनिमूनच्या वेळी मित्राला नेलं... पत्नीला कारणं देऊन राहिला दूर!

लग्नानंतर नवदाम्पत्याने हिमाचल प्रदेश येथे हनिमुनला जाण्याचे ठरवले. पतीने उमेश याला आपल्यासोबत तेथे नेले. त्या ठिकाणी पती वेगवेगळी कारणे सांगून तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा, तसेच बाहेर फिरायला जाताना तो उमेश याला सोबत घेण्याचा हट्ट धरायचा. पतीच्या अशा विचित्र वागण्यामुळे महिलेला त्याचा संशय आला.

पुण्यातील बनावट कंपनीचं ऑफर लेटर

लग्न करण्यापूर्वी तरुणीचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ३६ हजार, तर तरुणाचे उत्पन्न ८ लाख रुपये होते. मात्र त्याने पुण्यातील एका कंपनीचे ऑफर लेटर दाखवून त्याला वार्षिक १४ लाख रुपयांची नोकरी मिळणार असल्याचे सांगितले होतं. मात्र संबंधित ऑफर लेटर हे त्यानेच तयार केल्याचं सापडलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com