महिलेने स्वत:वरच केले चाकूने वार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - मित्राबरोबर झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने स्वत:वरच चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी (ता. 5) ताडदेवच्या रेसकोर्स परिसरात घडली. त्या महिलेवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ही महिला मुंबई सेंट्रल परिसरात राहते. तिचे चार वर्षांपासून एका तरुणाबरोबर मैत्रीचे संबंध होते. या महिलेला त्याच्यासोबत लग्न करायचे होते; परंतु त्याच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. ताडदेव रेसकोर्स परिसरात गुरुवारी सायंकाळी ती महिला आणि तिचा मित्र भेटले. या दरम्यान त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिने घरातून आणलेल्या चाकूने स्वत:वर वार केले.

Web Title: The woman had himself made knife slash

टॅग्स