वयाच्या मुद्द्यावरून महिलेची सक्तमजुरी रद्द

Court
Court

मुंबई - घरात बेकायदा मद्यसाठा केल्याच्या आरोपात 59 वर्षांच्या एका महिलेला उच्च न्यायालयाने दोषी ठरवले, परंतु तिचे वय ध्यानात घेऊन न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश दिला. तिला ठोठावलेला दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

चंद्रपूर सत्र न्यायालयाने या महिलेला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेविरोधात तिने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अपील याचिका केली होती. याप्रकरणी न्या. एम. जी. गिरटकर यांनी निकालपत्र जाहीर केले आहे. अभियोग पक्षाच्या आरोपपत्रानुसार, आरोपी महिलेच्या घरात 2009 मध्ये देशी दारूच्या बाटल्या पोलिसांना सापडल्या होत्या. पोलिसांनी एकूण 48 बाटल्या जप्त केल्या आणि त्यातील एक बाटली पंचनाम्यासाठी पंचांसमोर उघडली होती. सत्र न्यायालयाने अभियोग पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून या महिलेला दोषी ठरवले आणि तीन वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तथापि, जप्त केलेल्या देशी दारूच्या बाटल्या आपल्या घरातून मिळाल्याचे पोलिस सिद्ध करू शकले नाहीत, असा दावा करत या महिलेने उच्च न्यायालयात अपील केले होते. हा दावा उच्च न्यायालयाने अमान्य केला. पोलिसांनी दारू जप्त केल्याचे महिलेने मान्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com