गौठणपाडा येथे महिलेवर बलात्कार करून हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

भिवंडी तालुक्‍यातील गौठणपाडा (महाळुंगे) येथे रात्रीच्या वेळेस घरी सोडण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. 

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्‍यातील गौठणपाडा (महाळुंगे) येथे रात्रीच्या वेळेस घरी सोडण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. 

प्रीती दिलीप भावर (वय 29 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. महिला कामावरून घराकडे जात असताना तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. ही महिला वलिव येथून एका खासगी वाहनाने रोज प्रवास करत असे. काल रात्रीच्या वेळेस ती घरी जात असताना, अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अज्ञातांकडून बलात्कार करण्यात आला. नंतर साडीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
याबाबत येथील श्रमजीवी संघटनेने गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या अत्याचाराच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलिस ठाण्यासमोर निषेध व्यक्त केला. आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश सांगडे करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman raped and murdered in Gauthanpada IN BHIVANDI