सिनेस्टाईल थरार! लॉकडाऊनमुळे महिलेने घेतला गळफास, पोलिसांनी तत्परतेने वाचविला जीव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

लॉकडाऊनमुळे उपासमारीला कंटाळून उलवे सेक्टर-5 येथील महिलेने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन बेडरुममध्ये गळफास देखील घेतला; मात्र घराच्या हॉलमध्ये एकटीच असलेली तीची चिमुकली रडु लागल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता, घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने दोघींचाही जीव वाचविला.

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद झाल्याने मागील तीन महिने ती आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीसह कसे बसे जगत होती; मात्र काही दिवसांपासून उपासमारीमुळे तीची व तीच्या चिमुकलीचे प्रचंड हाल सुरु झाले. त्यामुळे या उपासमारीला कंटाळून अखेर तीने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन बेडरुममध्ये गळफास देखील घेतला; मात्र घराच्या हॉलमध्ये एकटीच असलेली तीची चिमुकली रडु लागल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता, घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने दोघींचाही जीव वाचविला. 

ही बातमी वाचली का? सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

हा घटनाक्रम कुठल्या सिनेमातील अथवा नाटकातील नसून, उलवे सेक्टर-5 मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. या महिलेचे ज्या पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले आहेत. त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद झाल्याने लाखो लोकांचे रोजगार गेले. उलवे सेक्टर-5 मध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीसह राहणारी विवाहिता देखील त्यातीलच एक आहे. मिळेल ते काम करुन तिने तीन महिने कसेबसे काढले. मात्र काही दिवसांपासून तीची व तीच्या चिमुकलीचे उपासमारीमुळे प्रचंड हाल सुरु झाले होते. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या या विवाहितेने गुरुवारी (ता.18) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास बेडरुममध्ये गळफास लावण्याचा प्रयत्न केला. 

ही बातमी वाचली का? अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

बीट मार्शल पोलीस नाईक किरण स्वार व पोलीस शिपाई पांडुरंग कवठे या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला देखील पाचारण केले. यावेळी बीट मार्शल पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी फ्लॅटचा दरवाजा तोडुन हॉलमध्ये असलेल्या 4 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले. त्यांनतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी बेडरुमचा दरवाजा तोडुन गळफास घेतलेल्या आईला खाली उतरविले. यावेळी महिलेच्या बोटाची हालचाल होत असल्याचे निदर्शनास आल्याने फायर फायटर राकेश सरोदे यांनी महिलेस तात्काळ सीपीआर दिल्याने तिची हालचाल सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता महिलेला रुग्णालयात दाखल केले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman strangled due to lockdown, Police immediately rescued the life