गच्चीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - मानसिक तणावातून महिलेने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.९) अंधेरी पूर्वेकडील एमएमआरडीए कॉलनीत घडली. मेघा महेंद्र तळेकर (४६) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मेघा पती आणि दोन मुलांसह एमएमआरडीए कॉलनीत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक तणावात होत्या. सोमवारी पहाटे त्यांनी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. त्या घरात न दिसल्याने घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. सकाळी १० वाजता इमारतीच्या मागील बाजूस मेघा यांचा मृतदेह आढळला. 

Web Title: The woman's suicide by jumping on the terrace

टॅग्स