ज्वेलर्सना गंडा घालणाऱ्या महिलांना भिवंडीत अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

भिवंडी - सोने खरेदीच्या निमित्ताने दुकानांमध्ये प्रवेश करून दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना निजामपूरा पोलिसांनी अटक केली आहे. या महिला मालेगावमधील आहेत. भिवंडी-निजामपूरामधील दुकानदाराच्या दक्षतेमुळे त्यांना अटक झाली. 

सईदा रहिमतुल्ला अन्सारी (30), आयशा इरफान शेख (20) आणि इरफाना इस्माईल शेख (34 रा. मालेगांव) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. या तिघींनी रविवारी (ता. 1) सायंकाळी निजामपूरा परिसरातील मारिया ज्वेलर्स या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला. दुकानमालक अब्दुल गफार खान यांना दागिने दाखवण्यात गुंतवून आयशा हिने दागिने असलेला प्लास्टिकचा डबा गुपचूपपणे कपड्यात लपवला. या डब्यात छोट्या मोठ्या आठ अंगठ्या, एक जोड कानातील रिंग आदी 28 हजार 500 रुपये किमतीचे दागिने होते. दागिने घेऊन या तिघीही पसार होत असताना दुकानमालक अब्दुल यांच्या दागिन्यांचा छोटा डबा चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्या महिलांना दुकानाबाहेरच गाठले. त्यानंतर पोलिस ठाण्यात कळवले. या महिलांनी भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक दुकानांमधून चोरी केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

Web Title: Women arrested in Bhiwandi