बालक चोरीप्रकरणी महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

मुंबई - तीन महिन्यांचे बालक पळवणाऱ्या महिलेला दादर रेल्वे पोलिसांनी गजाआड केले. शबाना सिंकदर असे आरोपी महिलेचे नाव आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. या महिलेला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

सीएसएमटी परिसरात राहणारी सीमा मांजरेकर ही महिला स्वच्छतेचे काम करते. तिच्यासोबत शबानाही काम करत होती. सीमाचा तीन महिन्यांचा मुलगा शुभम शबानाला आवडत असे. त्याच्या पालकत्वासाठी शबाना सीमाकडे सतत मागणी करत होती; मात्र सीमा प्रत्येक वेळी तिला नकार देत होती. अखेर शबानाने मुलाला पळवण्याचा कट रचला. 28 जूनला शबानाने सीमा हिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने दादरला आणले.

सीमाला स्वच्छतागृहात जायचे असल्यामुळे तिने शुभमला शबानाकडे दिले. ही संधी साधून शबानाने शुभमचे अपहरण केले. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी शबानाला गेल्या आठवड्यात ताब्यात घेऊन शुभमची सुटका केली.

Web Title: women arrested by child theft crime