बचतगटाच्या महिलांनी साकारले "गोमय' गणेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुरबाड परिसरात मागील तीन वर्षांपासून "नंदिनी गो ग्राम' गायींच्या रक्षणासाठी उपक्रम राबवत आहे. गोपालक शेतकऱ्यांना गायीच्या दुधापासून विविध पदार्थ बनवण्याचे तसेच महिलांना गायीचे शेण, गोमुत्र यापासून धुप, उदबत्ती, साबण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक कारागीरांकडून प्रशिक्षण घेत बचत गटाच्या महिलांनी "गोमय गणेश' तयार केले आहेत. 

कल्याण : देशी गायींचे शेण, गोमुत्र आणि शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती बचत गटाच्या महिलांनी साकारल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी मागील तीन वर्षांपासून "नंदिनी गो ग्राम'च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. पाच महिलांनी मूर्तीकाराच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी चाळीस गणेश मूर्ती साकारल्या आहेत. 

मुरबाड परिसरात मागील तीन वर्षांपासून "नंदिनी गो ग्राम' गायींच्या रक्षणासाठी उपक्रम राबवत आहे. गोपालक शेतकऱ्यांना गायीच्या दुधापासून विविध पदार्थ बनवण्याचे तसेच महिलांना गायीचे शेण, गोमुत्र यापासून धुप, उदबत्ती, साबण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक कारागीरांकडून प्रशिक्षण घेत बचत गटाच्या महिलांनी "गोमय गणेश' तयार केले आहेत. 

मूर्तीकाराच्या मार्गदर्शनाखाली पाच महिलांनी चाळीस गणेश मूर्ती साकारल्या असून, त्या एक ते दीड फूट उंचीच्या आहेत. त्यांची किंमत 1600 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी या गणेशमूर्ती उत्तम पर्याय आहेत, असा विश्वास "नंदिनी गो ग्राम'च्या श्रेयस म्हसकर यांनी व्यक्त केला. या गणेश मूर्तीच्या नोंदणीसाठी 9664285437 यां क्रमांकावर संपर्क साधावा. 

केवळ नैसर्गिक रंगांचा वापर 
गो ग्राममधील गणेश मूर्तींसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. पाण्यात विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती विरघळून जाते. मूर्तीसाठी केवळ नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जात असल्याने पाणीही प्रदूषित होत नाही. गाईच्या शेणाचा वापर करून शोभिवंत वस्तू तयार करण्याचा उपक्रम संस्थेने आखला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The women of Bachgat group have achieved "Gomay" Ganesh