मुलाच्या लग्नासाठी मुंबईत गेलेल्या महिलेचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

संबधित महिला सावंतवाडी येथील आहे. प्रतिभा प्रसाद कोरगावकर असे नाव आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी ती मुंबईत गेली होती. 25 एप्रिलला तिच्या मुलाचे लग्न होते.

मुंबई : गोरेगाव येथील सिद्धार्थनगर परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

अपघातात रिक्षाचालकासह आणखी दोन महिलाही जखमी झाल्या असून या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी ३६ वर्षीय कारचालकाला अटक केली आहे. प्रतिभा असे मृत महिलेचे नाव असून गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०४ (अ), २७९ व ३३७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबधित महिला सावंतवाडी येथील आहे. प्रतिभा प्रसाद कोरगावकर असे नाव आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी ती मुंबईत गेली होती. 25 एप्रिलला तिच्या मुलाचे लग्न होते.

Web Title: women dead in accident