गोराई खाडीत सापडला महिलेचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - गोराईच्या खाडीत मंगळवारी (ता. 17) महिलेचा मृतदेह आढळून आला. स्नेहा पटेल (वय 37, रा. समतानगर, कांदिवली-पूर्व) असे तिचे नाव आहे. गोराई पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे. स्नेहा गंभीर आजाराची लागण झाल्याने 11 वर्षांपासून एका सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती.

मंगळवारी सकाळी गोराईतील ग्रामस्थांना महिलेचा मृतदेह खाडीत आढळून आला. स्थानिक रहिवासी व जीवरक्षकांनी तिला बाहेर काढून त्याची माहिती गोराई पोलिसांना कळवली. घटनास्थळी मृतदेहाकडील बॅगेत मिळालेल्या फाइलवरून पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानुसार स्नेहाच्या मृत्यूची माहिती नातेवाइकांना कळवण्यात आली. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवला. स्नेहाने आत्महत्या केली, की तिचा बुडून मृत्यू झाला, याचा तपास गोराई पोलिस करत आहेत.

Web Title: women deathbody receive in gorai creek