मालवणीत महिलेची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - मालवणी मढ येथे लॉजमध्ये झालेल्या इंदू दिनेश तातड (33) हिच्या हत्येप्रकरणी तिच्या दीराला मालवणी पोलिसांनी नवसारी येथून अटक केली. हरीश तातड असे त्याचे नाव आहे. या घटनेत दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. इंदूच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मालाडच्या पुष्पा पार्क परिसरात दिनेश तातड राहतो; तर हरीश तातडही त्याच परिसरात राहतो. हे दोघेही कडियाकाम करतात. एकाच कुटुंबातील असल्याने हरीश हा दिनेशच्या घरी जायचा. यादरम्यान इंदू आणि हरीशच्या मैत्रीचा प्रकार दिनेशला समजला होता. त्या दोघांनाही दिनेशने ताकीद दिली होती. तरीही सोमवारी दुपारी ते दोघेही मढ येथील लॉजमध्ये गेले होते. तेथे त्या दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर हरीशने इंदूवर चॉपरने वार केले. वार केल्यानंतर हरीश पळून गेला. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या इंदूला पोलिसांनी रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित केले. इंदूच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी हरीशविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. चाकूहल्ल्यात हरीशला दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळताच पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. 

Web Title: Women murder in mumbai

टॅग्स