दारू दुकानांविरोधात महिला संघटनांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गालगत 500 किलोमीटरच्या आत उभी असलेली दारू दुकाने बंद केल्याने आता ही दुकाने गावांमध्ये प्रवेश करणार आहेत. गावांमध्ये दारू दुकाने सुरू करण्यास मज्जाव करणारा ठराव ग्रामसभेने येत्या 1 मे रोजी मंजूर करावा, अशी मोहीम महिला संघटनांनी सुरू केली आहे.

महाराष्ट्र शासनाने 17 ऑगस्ट 2011 रोजी घोषित केलेल्या दारूबंदी धोरणानुसार कोणत्याही गावात दारू दुकाने सुरू करायची असतील तर 50 टक्के महिलांची सहमती आवश्‍यक केली आहे. किंवा ग्रामसभेत उपस्थित असलेल्या अर्ध्या ग्रामस्थांनी त्यासंबंधाचा ठराव करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल बुडत असल्याने नाराज झालेल्या दारू दुकानदारांनी गावकऱ्यांना हाताशी धरून गावात दुकाने सुरू करायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला खीळ लावण्यासाठी 1 मे रोजी होणारी ग्रामसभा दारूबंदीचा निर्णय घेणारी ठरो, असे प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुरू केले आहे. या मोहीमेचे लोण गावागावांत पोचावे यासाठी निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनीधी मोहीम राबवत असल्याचे समजते.

Web Title: women organisation campain wine shop oppose