
Crime News : महिला पोलिसांनी आवळल्या चोराच्या मूसक्या!
मुंबई : लोकल ट्रेनच्या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट आणि मोबाईल चोरीचा घटनेत वाढ होत आहे. नुकताच पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानक लोकलमध्ये चढत असताना प्रवाशाचे पाकीट चोरणाऱ्याच्या चोरट्याला महिला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. समीर असे आरोपीचे नाव वांद्रे बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकात गुरुवारी प्रवासी बजरंगी मुसाफिर यादव हे वांद्रे रेल्वे स्टेशन येथील फलाट क्रमांक ७ वर सीएसटी लोकलमध्ये चढत असताना एका व्यक्तीने त्यांच्या नकळत पॅन्टच्या मागील खिशातील पाकीट काढले. यादव यांना जाणवले असता त्यांनी लागलीच मागे वळून पाहिले तेव्हा एक इसम लगबगीने गर्दीतून उतरून फलाटावर जात असताना दिसला.
ते चोर चोर असे ओरडले असताना कर्तव्यावर हजर असलेले महिला सुरक्षा पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी त्याच्या पाठलाग करून मुसक्या आवडल्या आहे. त्या चोराकडून पाकीट ताब्यात घेतले असता त्यामध्ये आधारकार्ड , ड्राइव्हींग लायसन्स/ कोटक बँकेचे एटीएम कार्ड आढळले. ते यादव यांचेच होते.