महिला पोलिसांनी पळणाऱ्या चोराला केली अटक

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई : पोलिस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पळणाऱ्या चोराला पाठलाग करुन ताफिने पकडणाऱ्या दोन महिला पोलिसांचे डोंगरीतील स्थानिक महिलांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. या शूरवीर पोलिसांचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले. 

महिला पोलीस हवालदार अश्विनी पवार व शितल रिकामे  गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी डोंगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिस वाहनातून पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबर मिळाली की एक व्यक्ति चोरी करुन पळून जात आहे. त्या नुसार त्यांनी धाड़साने चोरी करुन पळणाऱ्या इब्राहिम हुसेन या चोराला त्याचा पाठलाग करून पकडले. मुद्देमालासह गाडीत घालून त्याला डोंगरी पोलीस स्टेशनला जमा केले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अशा या निडर आणि धाड़सी महिला पोलिस शिपाई अश्विनी पवार व शितल रिकामे यांच्या धाडसाचे व त्यांच्या कर्तृत्वाचे पोलिस निरिक्षक संदीप भागड़ीकर आणि निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सत्कार करुन विशेष कौतुक केले.

Web Title: The women police arrested the thief