महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’

Whatsapp
Whatsapp

मुंबई - लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) दामिनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी हेल्पलाइन क्रमांक १८२ वर संपर्क साधायचा आहे. 

लाखो महिला दररोज लोकलने प्रवास करतात. चोरी, दागिने हिसकावणे, छेडछाड, विनयभंगासारख्या घटनांना महिलांना सामोरे जावे लागते. त्यावर महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅक प्रणाली आदी उपाययोजना करण्यात आल्या. त्यापाठोपाठ आता मध्य रेल्वे महिलांच्या सुरक्षेसाठी व्हॉट्‌सॲपची मदत घेणार आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने महिला प्रवाशांसाठी ‘दामिनी’ नावाचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करणार आहेत. हे ग्रुप दोन स्थानकांच्या टप्प्यांनुसार असतील. या ग्रुपमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला अधिकारी आणि रेल्वे पोलिस महिला अधिकारी अशा एकूण ३०० अधिकारी असतील. या ग्रुपवर महिला प्रवाशांनी सुरक्षेबाबत समस्या टाकल्यास त्यावर त्वरित कारवाई करणे शक्‍य होणार आहे, असे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com