esakal |  #Women'sDay : महिलांनो तुमच्यातल्या 'या' गुणांवर करा गर्व..... 
sakal

बोलून बातमी शोधा

 #Women'sDay : महिलांनो तुमच्यातल्या 'या' गुणांवर करा गर्व..... 

 #Women'sDay : महिलांनो तुमच्यातल्या 'या' गुणांवर करा गर्व..... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करतायत. क्रीडा, साहित्य, कला, तंत्रज्ञान अशा कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाहीयेत. पुरुषांमध्ये जे गुण असतात ते महिलांकडेही असतात हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मात्र असेही काही गुण आहेत जे फक्त महिलांकडे असतात आणि महिलांनी या गुणांवर गर्व करायला हवा.
 
बऱ्याच महिला नोकरी किंवा व्यवसायामध्ये मोठ्या पदावर असतात. यात महिलांना लीडरशिप करण्याची संधी असते. यात महिला नेहमी पुरुषांसोबत स्वतःची तुलना करत असतात. मात्र महिलांनो तुमच्यातच काही सुप्त गुण लपले आहेत ज्याबद्दल बहुदा तुम्हालाही कल्पना नसेल. म्हणून आता पुरुषांसोबत तुलना करू नका आणि तुमच्यात असलेल्या या गुणांवर गर्व करा. जाणून घ्या कोणते आहेत हे गुण.

हेही वाचा: #holi2020: या होळीत 'अशी' घ्या लहानग्यांची काळजी....  

(१) सहयोगाची भावना :

महिला कायमच आपल्या कामात सोबत काम करणाऱ्या लोकांचा विचार करतात. सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहयोगाने काम करण्याची क्षमता महिलांमध्ये असते. आणि म्हणूनच महिला आपल्या सोबत असणाऱ्या सर्वांचं योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करू शकतात. महिलांनी त्यांच्यातील या गुणाचा गर्व करायलाच हवा.

(२) तणाव हाताळण्याची क्षमता:

अनेकदा काम करत असताना आपल्याला तणावाचा सामना करावा लागतो. मात्र अशा स्थितीतदेखील शांत आणि संयमी राहून महिला उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळू शकतात. महिलांना अशा कठीण स्थितीचा त्रास सहन करावा लागत नाही. महिला लगेच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये स्वतः बद्दल विश्वास निर्माण करतात. याचा फायदा त्यांना तणावाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात होतो. 

धक्कादायक ! १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोनाबाबतची भविष्यवाणी खरी ठरणार?

(३) मल्टिटास्किंग : 

महिलांना मल्टिटास्किंग उत्तम प्रकारे करता येतं. अनेकदा ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी महिलांना एकाच वेळी सांभाळत असतात. त्यामुळे महिला एकाच वेळी अनेक कामं उत्तमरीत्या हाताळू शकतात. विशेष म्हणजे महिलांचं प्रत्येक कामावर बारीक लक्ष असतं. कोणतंही काम महिला अर्धवट सोडत नाहीत.   

(४) मोकळेपणा:

महिलांना गॉसिप करायला खूप आवडतं हे आपल्याला माहिती आहे. मात्र महिला स्वतःजवळ असलेली महत्वाची माहिती अगदी मोकळेपणानं समोरच्याला सांगू देखील शकतात, समजाऊ शकतात. त्यामुळे महिलांना माहितीची देवाण घेवाण करणं सोपं होतं.

हेही वाचा: CSMT रेल्वे स्थानकाला फाइव्ह-स्टारचा दर्जा...

(५) सजगता 

महिलांना सर्वांची काळजी असतेच. आपल्या आसपासच्या लोकांना काय हवं, काय नको हे त्यांना बरोबर माहीत असतं. म्हणूनच आपल्या आसपास कुणी त्रासात असेल किंवा दुःखी असेल तर महिला या गोष्टी चटकन ओळखू शकतात. थोडक्यात महिला या अधिक सजग असतात. 

womens day every women should know these hidden qualities within them

international womens day