esakal | कल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण होणार काम
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण होणार काम

नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला बुधवार (ता 19) रोजी रात्री 10 वाजता कामाला सुरुवात झाली. 24 ऑगस्ट पर्यंत काम सुरू असणार आहे.

कल्याणमधील नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरूवात; इतक्या दिवसांत पुर्ण होणार काम

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण - नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला बुधवार (ता 19) रोजी रात्री 10 वाजता कामाला सुरुवात झाली. 24 ऑगस्ट पर्यंत काम सुरू असणार आहे. पत्रिपुलाच्या अंतिम टप्यात कामाला सुरुवात झाली असून आगामी एक ते दीड ते महिन्यात वाहतुकीला पत्रिपुल उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

रस्ते विकास महामंडळमार्फत कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल पाडून नव्याने पत्रिपुल बनविण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे .नवीन पत्रिपुलाचे काम अंतिम टप्यात असून नवीन पत्रिपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन बाजूच्या पुलावर ठेवून गर्डर ठेवण्याच्या कामाला बुधवार ता 19 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सुरुवात झाली.

या कामासाठी पत्रिपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांच्यावतीने एका अधिसूचना काढून पर्याय मार्ग जाहीर करण्यात आले आहे. आगामी 24 ऑगस्ट पर्यँत हे काम सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी काम सुरू झाल्याने जागो जागी वाहतूक पोलीस उभे असताना वाहन चालकांची तारांबळ उडाली होती. रात्री 10 वाजल्या पासून सुमारे 6 तास मोठ्या क्रेनच्या मदतीने 40 कर्मचारी वर्गाने काम केले. पहिल्या दिवशी 20 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी दिली. 

मुंबई तुंबल्याचे खापर फोडले पर्जन्य वाहीन्यांवर; BMC ने काढला नवा निष्कर्ष

नवीन पत्रिपुल कसा असेल .....

नवीन पत्रिपुलाचे काम नवीन पत्रिपुलाची लांबी 110 मीटर असून पुलाची रुंदी 11 मीटर आहे . पुलाच्या कामात ओपन वेब स्ट्रील गर्डर 77मीटर असून सेमी थ्रू टाईप स्टील गर्डर 33 मीटर , 1200 मी मी व्यासाचे 22 नग पाईल फाउंडेशन 3 नग ( 2 अब्रुटमेंट व 1 पियर ) आहे तर 22 पैकी 5 पाईल पूर्ण , 5 पाईलचे काम प्रगतीपथावर असून हैद्राबाद येथे रेल्वे मार्फत मंजूर असलेल्या कार्यशाळेत पुलाच्या कामात ओपन वेब स्ट्रील गर्डर 77मीटर असून सेमी थ्रू टाईप स्टील गर्डर 33 मीटरचे काम करण्यात आले आहे .आता हे काम अंतिम टप्यात आहे आणि नवीन पत्रिपुल पूर्ण झाल्यास कल्याण डोंबिवली करांना मोठ्या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येणार आहे .

नवीन पत्रिपुलाच्या गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले म्हणजे अंतिम टप्पा सुरू झाला आहे . काम सुरू असल्याने रात्रीच्या वेळेत वाहतूक मध्ये बदल केला असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले असून पुढे म्हणाले की , मागील दौऱ्यात सांगितल्या प्रमाणे एक दीड महिन्यात नवीन पत्रिपुल वाहतुकीला उपलब्ध होईल अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली .

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )

loading image
go to top