पालघर जिल्ह्यातील रस्ते नुतनीकरणावर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह

अच्युत पाटील
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बोर्डी-अस्वाली रस्त्याचे नुतनिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार चक्क डहाणू पंचायत समितीचे बोर्डी गणाचे सदस्य प्रशांत पाटील यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागिय अभियंता आर. टी. खैरनार यांच्याकडे केल्याने खळबळ माजली आहे.

बोर्डी - पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागातंर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते नुतनीकरण कामे केली जात आहेत. मात्र या कामांवर संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने होणारी कामे निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहेत. बोर्डी-अस्वाली रस्त्याचे नुतनिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार चक्क डहाणू पंचायत समितीचे बोर्डी गणाचे सदस्य प्रशांत पाटील यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता आर. टी. खैरनार यांच्याकडे केल्याने खळबळ माजली आहे.

Bordi Road

बोर्डी विजयस्तंभ ते अस्वाली आठ किलोमीटर रस्त्याचे 2 कोटी 70 लक्ष रुपये खर्च करून नुतनीकरण आणि डांबरीकरणचे काम स्थानिक ठेकेदार पी. एम. रत्नाकर यांचे कंपनीच्या माध्यमातून सुरू केले आहे. या रस्त्यावर असलेल्या आठ मोऱ्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मोऱ्यांचे बांधकाम सिमेंट काँक्रिट वापरुन केले. परंतु अतिशय निकृष्ठ आहे. तर डांबरीकरण करताना देखील पुरेसा डांबराचा वापर न केल्याने ठिकठिकाणी टाकलेली खडी उखडुन खड्डे पडण्यास सुरवात झाली असल्याची तक्रार प्रशांत पाटील यांनी केली आहे.

Bordi Road

दरम्यान या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालगर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागिय अभियंता श्री. वसईकर यांना दूरध्वनी वरून संपर्क केला असून सदर रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवर करावी, अशी मागणी खरपडे यांनी केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The work of renovation of roads in Palghar district is getting degraded