आणखी एका जखमीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या सुप्रीम कंपनीच्या दोघांची गुरुवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. दरम्यान, दुर्घटनेत जखमी झालेल्या दत्तू किसन नरवडे याचा रुग्णालयात आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 10 वर पोचली आहे.

कामगार रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी आग लागली होती. रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 142 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते.

रुग्णालय प्रशासन आणि एनबीसीसी दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. बुधवारी (ता. 19) सायंकाळी पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला. यातील अभियंता नीलेश मेहता आणि नितीन कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. या प्रकरणी पोलिस आता वेल्डरचा शोध घेत आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी पोलिस करणार आहेत.

Web Title: Worker Hospital Fire Death