मुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

गोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव  पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई तालुकाध्यक्ष रमेश पाईकराव हेही कामा इस्टेट गोरेगाव पूर्वेला राहतात. बुधवारी सकाळी उषा रामलू यांच्या मुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया सकाळी दहा वाजता सिध्दार्थ हॉस्पिटलमध्ये होती. त्याच दिवशी रमेश पाईकराव यांना बोरिवली न्यायालयाचे समन्स होते, जामीन देखील घेणे क्रमप्राप्त होते. एका राजकीय गुन्ह्यासाठी पाईकराव यांना बोरिवली न्यायालयात जाणे क्रमप्राप्त होते. 

दरम्यान उषा रामलू यांना पाईकराव यांच्या बाबत समजल्यावर त्यांनी आपल्या नातेवाईकांना मुलीकडे हॉस्पिटलमध्ये पाठवले. आणि स्वतः आपल्या सहकारी वकील अभया सोनवणे यांना घेवून बोरिवली न्यायालयात पोचल्या. रमेश पाईकराव यांचे समन्स रद्द होई पर्यंत, जामीन मिळेपर्यंत व न्यायालयाचे सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत उषा या पाईकराव यांच्या सोबत राहिल्या.

दुपारी उशिरा गोरेगावला येवून मग आपल्या मुलीकडे गेल्या.अनेकदा सामान्य कार्यकर्ते आपले नेते व पक्षासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतात मात्र सर्वानाच पुन्हा मदत मिळतेच असे नाही.उषा रामलू यांनी आपल्या कृतीतून अनेक राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले हे मात्र खरे.

Web Title: A worker who is keeping a girl's abdominal surgery aside will help the court