मुंबई : रेल्वे सफाई कामगारांकडून कामबंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मध्य रेल्वेवरील वाडीबंदर यार्डमध्ये पगार आणि दिवाळी बोनस दिला नाही म्हणून सफाई कामगारांनी आज (ता. 18) सकाळी 7 वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवरील वाडीबंदर यार्डमध्ये पगार आणि दिवाळी बोनस दिला नाही म्हणून सफाई कामगारांनी आज (ता. 18) सकाळी 7 वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी पगार आणि दिवाळी बोनस देणार असे ठेकेदारांकडून सांगण्यात आले होते. मात्र अजूनही या सफाई कामगारांना पगार मिळाला नाही. तसेच आज वाडीबंदर यार्डमध्ये 300 कामगारांकडून पगार मिळेपर्यंत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवार (ता. 11 ला) पगार देऊ असे ठेकेदारांनी सांगितले हाेते, मात्र आज 18 तारीख आली तरी अजून पगार देत नाही असे सफाई कामगारांकडून सांगण्यात आले. हे कामबंद आंदोलन माझगाव, सीएसएमटी, दादर येथील सर्व सफाई कामगार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers' agitation by railway cleaning workers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: