आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कांदिवली पश्‍चिमेला असलेल्या केडी कंपाऊंडमधील बजरंग सेवा सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामादरम्यान (एसआरए) एका कामगाराचा मृत्यू झाला.

मुंबई : कांदिवली पश्‍चिमेला असलेल्या केडी कंपाऊंडमधील बजरंग सेवा सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामादरम्यान (एसआरए) एका कामगाराचा मृत्यू झाला. आठव्या मजल्यावरून पडून हा कामगार मरण पावला.

रुपारेल डेव्हलपरद्वारे हे काम सुरू असून कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या इमारतीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू झाला होता. त्याबाबत संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती परिमंडळ 11 चे पोलिस उपायुक्त डॉ. एम. दहिकर यांनी दिली. 

web title : Worker's death after falling from the eighth floor

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker's death after falling from the eighth floor