आयुक्तांकडून कामचुकारांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नवी मुंबई - महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी मंगळवारी (ता. २) शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना अचानक भेट देऊन मॉन्सूनपूर्व कामांची पाहणी केली. त्यात अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले. काही ठिकाणी प्लास्टिकचा कचरा, गाळ व कचऱ्याने भरलेली गटारे, नाल्यात तुंबलेले पाणी, पदपथांवर दुकानदारांनी टालेला कचरा असे अनेक प्रकार आयुक्तांच्या नजरेला पडले. त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन ही कामे करण्याचे आदेश दिले. काही कर्मचाऱ्यांना त्यांनी समज दिली. 

रामास्वामी यांनी आता महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी सकाळी अचानक नवी मुंबईतील परिमंडळ दोनमधील कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागांचा दौरा करून मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. सकाळी रस्त्यावर सुरू होणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाच्या वेळांची माहिती घेतली. काही कामगार वेळेवर हजर नसल्याचे आढळल्याने त्यांनी अशा कामगारांना समज देण्याच्या सूचना घनकचरा विभागाला दिल्या. कोपरखैरणे व घणसोली विभागातील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना आढळले. या नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी अनेक ठिकाणी तुंबले आहे. त्यामुळे हे नाले साफ करण्याचे आदेश त्यांनी दिले. गटारांमधून काढलेला गाळ गटारांच्या कडेला ठेवल्याचे पाहणीत आढळले. तो कचरा तत्काळ उचलण्याचे आदेश संबंधितांना दिले. ऐरोली व कोपरखैरणे भागात काही दुकानदारांनी पदपथ व रस्त्यांवर कचरा टाकल्याचे आढळले. या दुकानदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. रामास्वामी यांनी घणसोली एनएमएमटी बस डेपोही भेट दिली.

शहरातला तिसरा दौरा
एन. रामास्वामी यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी तिसऱ्यांदा शहराचा पाहणी दौरा केला. सर्वात आधी त्यांनी तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंडला अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांची वस्तुस्थिती पाहण्यासाठी अचानक रुग्णालयांना भेट दिली होती. त्यात त्यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला होता.

Web Title: Workers' plantation from the Commissioner