'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'

'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'

मुंबईः  मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या अनुभवांनुसार तज्ञांच्या सल्ल्याने जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. 

योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडला उत्तर प्रदेशात नेणार आहेत, अशी टीका करणाऱ्यांनाही त्यांनी, बडा बनना चाहिये, बडी सोच रखनी चाहिये, असा टोला लगावला. आम्ही कोणाचेही काहीही घ्यायला आलो नाही, आम्ही नवी फिल्मसिटी बनविणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  चित्रपटसृष्टीची तसेच चित्रपटरसिकांचीही आजची गरज काय आहे, हे शोधून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही फिल्मसिटी उभारली जाईल, असेही आदित्यनाथ म्हणाले. 

बॉलिवूड किंवा येथील अन्य कुठलीही गोष्ट न्यायला मी आलो नाही. येथून बाहेर न्यायला बॉलिवूड ही काही पर्स नाही. कोई किसी चीज को लेके नही जा सकता, ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षाव्यवस्था, व्यवस्थित सोयी, भेदभावरहित चांगले वातावरण अशा सोयी आम्ही उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीला देऊ. मुंबईची फिल्मसिटी आपले काम करेल. तर सध्याच्या चित्रपटसृष्टीच्या नव्या गरजा, नवे अनुभव लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील प्रस्तावित नवीन फिल्मसिटी काम करेल. आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने यासंदर्भातील मॉडेल तयार करू, जागतिक दर्जाची फिल्मसिटी तयार करण्यासाठी आम्ही चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.

जागतिक दर्जाच्या फिल्मसिटीच्या उभारणीसाठी आज येथील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि जाणकार मंडळींशी वैयक्तिक आणि एकत्रित चर्चा केली. नोएडाजवळ एक हजार एकर क्षेत्रफळावर ही फिल्मसिटी उभारली जाईल. आशियातील सर्वात मोठा जेवर विमानतळ तसेच नवी दिल्ली येथून हाकेच्या अंतरावर तर मथुरा, आग्रा ही शहरेही अर्धा ते एक तासाच्या अंतरावर असतील. या प्रकल्पात चित्रपट उद्योगानेही रस दाखविला आहे, असेही आदित्यनाथ म्हणाले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

World class film city set up in Uttar Pradesh as per new requirements Yogi Adityanath

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com