वरळी कोळीवाड्यावर पुन्हा कोरोनाचे सावट

वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे.
वरळी-कोळीवाडा
वरळी-कोळीवाडा File photo

मुंबई: पहिले प्रतिबंधित क्षेत्र ठरलेल्या वरळी कोळीवाड्याच्या परीसरावर कोविडच्या दुसऱ्या लाटेचाही प्रभावही जाणवू लागला आहे. आता पर्यंत कोळीवाडा तसेच आजूबाजूच्या परीसरात तब्बल 187 कोविडबाधीत उपचारधीन रुग्ण आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेत सुमारे चार महिने संपूर्ण वरळीकोळीवाड्यासह आजूबाजूचा परीसर सिल करण्यता आला होता. जानेवारी महिन्यात हे प्रतिबंध शिथील करण्यात आले. मात्र,आता पुन्हा या भागात कोविडचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा सर्व यंत्रणा अलर्टवर आणण्याचे काम सुरु झाले आहे.

वरळी-कोळीवाडा
कोरोना, लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे ५०० कोटीचे नुकसान

स्थानिक नगरसेविक,माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी नागरीकांना घरातच राहाण्याचे आवाहन केले आहे."महानगर पालिका प्रशासन आणि पोलिस विभागा बरोबर समन्वय ठेवून पुढील उपाय करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पालिका प्रशासना सोबत पाठपुरवठा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या रुग्ण आढळल्यावर त्या परीसराचे निर्जंतुकीकरण करणे, रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे अशी कामे केली जात आहेत. मात्र,आता धोका वाढतोय असे चित्र दिसत असल्याने या भागात काही निर्बंध लावण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुपारी बाजार बंद

राज्य सरकारच्या नियमावली नुसार अत्यावश्‍यक सेवा दुकाने, बाजार सुरु राहाणार आहेत. मात्र,आता त्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी सर्व दुकाने बाजार बंद ठेवण्याचा पर्याय आहे. त्याबाबत प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे तसेच,विनाकारण फिरणाऱ्यांवरही वचक येणे गरजेचे आहे.असेही त्यांनी सांगितले.

-

ऍक्‍टिव्ह रुग्ण

वरळी कोळीवाडा - 97

जनता कॉलनी - 21

आदर्श नगर - 69

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com