बिचुकलेचे ते 153 मतदार कोण? | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

मुंबई - शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या वरळी मतदारसंघात एक मोठा ‘चमत्कार’ घडला आहे. आदित्य यांना ‘टक्कर’ देण्यासाठी तेथे उतरलेले ‘बिग बॉस’ अभिजीत बिचुकले यांना तब्बल 153 मते मिळाली आहेत. ही बातमी पसरताच अशा उमेदवाराला मते देणारे हे 153 वरळीकर कोण असावेत याचीच चर्चा सध्या वरळीत रंगली आहे. 

वरळीतील निवडणुकीने सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असले, तरी तेथील निकाल हा आधीच लागल्यात जमा होता. तेथे आदित्य ठाकरे यांना मोठी आघाडी मिळणार यात कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे तेथील निवडणूक ही अगदीच पुचाट अशी झाली होती. त्यात थोडे फार रंग भरले ते अभिजीत बिचुकले नामक व्यक्तीने.

प्रचंड आत्मविश्वास आणि स्वतःवरील प्रचंड प्रेम या एकाच भांडवलावर उभी असलेली ही व्यक्ती वाहिन्यांना टीआरपी मिळवून देत होती. मात्र त्यांना कोणी मत देईल असे कोणालाही वाटत नव्हते. असे असतानाही त्यांना एवढी ‘प्रचंड’ मते मिळाल्याने वरळीकर अचंबित झाले आहेत. तेथील एका तरुणाने याबाबत मोठी गमतीशीर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाने बिचुकले यांच्या मतदारांची नावे जाहीर केली, तर एवढ्या ‘धाडसी’ आणि ‘विचारी’ कामगिरीबद्दल आम्ही शिवाजी पार्कवर त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू असे तो तरुण म्हणाला. 

WebTitle :  worli vidhansabha constetuency abhijit bichukale news updates

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worli vidhansabha constetuency abhijit bichukale news updates