वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

निवडणुकांचे कल येण्यास सुरवात झालीये. अशातच आता मुंबईमधील सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्‍या वरळी मधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. नुकतीच मतमोजणीला सुरवात झालीये. असताच सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.  

निवडणुकांचे कल येण्यास सुरवात झालीये. अशातच आता मुंबईमधील सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्‍या वरळी मधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. नुकतीच मतमोजणीला सुरवात झालीये. असताच सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.  

मतदानात घट :

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. 2014 रोजी या मतदारसंघात 55.75 टक्के लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी ही टक्केवारी 50.20 वर आली असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 5.55 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे.

दाक्षिणात्य पेहरावावरुन आदित्य ठाकरे ट्रोल

अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे आदित्य ठाकरेंना ट्रोल करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी 'हटाव लूंगी बजाव पुंगी'ची आठवण करुन दिली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर या परिसरात गुजरातीसह अनेक अमराठी भाषेतील होर्डिंग लावण्यात आले. त्यात 'केम छो वरळी' या गुजराती भाषेतील होर्डिंगवर तर प्रचंड टिका झाली होती. या टिके मुळे होर्डिंग हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही वरळीतील प्रचारात आदित्य ठाकरे यांनी लुंगी आणि पांढरा शर्ट असा दाक्षिणात्य पेहराव परीधान केलेला पाहायला मिळाला. त्यावरुनही आदित्य यांना सोशल मिडियावर पुन्हा ट्रोल केलं गेलं.

Webtitle : worli vidhansabha constutuency early morning trends


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worli vidhansabha constutuency early morning trends