लेखक रवीशंकर यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - वर्सोवा परिसरातील लेखकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. रवीशंकर आलोक (32) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मुंबई - वर्सोवा परिसरातील लेखकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. रवीशंकर आलोक (32) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

रवीशंकर यांनी दोन शॉर्टफिल्मचे लेखन आणि "अब तक छप्पन-2' या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ते वर्सोव्याच्या अमरनाथ टॉवरमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी ते एकटेच घरी होते. त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्रकार इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. रवीशंकरच्या भावाने ही माहिती वर्सोवा पोलिसांना कळवली. रवीशंकर हे दोन महिन्यांपासून तणावाखाली होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते.

Web Title: writer ravishankar aalok suicide