यंदाच्या साहित्य संमेलनात लेखकांना भेटण्याची संधी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - साहित्य संमेलनात लेखकांचे विचार ऐकता आले तरी त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही. यंदा डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनांत पुस्तके खरेदी करताना वाचक लेखकांनाही भेटू शकणार आहेत. संमेलनात 350 हून अधिक ग्रंथदालने असतील. 

प्रकाशकांनी आपल्या सेलिब्रेटी लेखकाची भेट वाचकांना करून द्यावी, असा प्रस्ताव ग्रंथ संयोजन समितीने प्रकाशकांसमोर ठेवला आहे. कोणता लेखक कधी भेटेल, याविषयीची सूचना प्रकाशकांनी त्यांच्या ग्रंथदालनात लावावी, असे कळवण्यात आले आहे. प्रकाशकांशी बोलणी सुरू असून काही प्रकाशकांनी त्याला होकारही दिला आहे. या उपक्रमाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल, असे ग्रंथ संयोजन समितीचे रवींद्र बेडकीहाळ म्हणाले. 

अनेक वर्षे मुंबई आणि परिसरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न झाल्याने यंदा संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी प्रकाशकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत 312 ग्रंथदालने बुक झाली आहेत. या व्यतिरिक्त राज्य व केंद्र सरकारची आठ ग्रंथदालने असतील. सोडत काढल्यानंतरही 10 ते 15 प्रकाशकांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे यंदा ग्रंथदालनांची संख्या 350हून अधिक असेल, अशी माहिती बेडकीहाळ यांनी दिली.

Web Title: Writers the opportunity to meet this sahitya sammelan