नॅशनल पार्कमध्ये पुन्हा यशचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश या नऊ वर्षीय वाघावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तो मंगळवारपासून टायगर सफारीत पर्यटकांना दर्शन देत आहे.  

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश या नऊ वर्षीय वाघावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तो मंगळवारपासून टायगर सफारीत पर्यटकांना दर्शन देत आहे.  

यशच्या तोंडाजवळ अडीच इंचाची गाठ आली होती. उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि त्यांच्या पथकाने ही गाठ यशस्वीरीत्या काढली. १३ ऑगस्टला ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे यशचे सफारीतील दर्शन बंद झाले होते. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून यशची नागपूरहून आणलेल्या बिजलीशी जोडी जमली होती. त्यांच्या मिलनातून उद्यानात नव्या बछड्याची वनाधिकाऱ्यांना आशा आहे. लवकरच यश-बिजली एकत्र दिसतील, असे नॅशनल पार्कचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.

Web Title: Yash tiger again appeared in National Park