अंध, दिव्यांग व विशेष मुलांनी बघितला चित्रपट; रोटरी क्लब ऑफ बदलापूरचा अनोखा उपक्रम

अंध, दिव्यांग व विशेष मुलांना चक्क एक चित्रपट दाखविण्यात आला. 'यलो' हा एका विशेष मुलीच्या आयुष्यावर असलेला चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.
yellow Movie for physically disable and special children Unique initiative of Rotary Club of Badlapur
yellow Movie for physically disable and special children Unique initiative of Rotary Club of Badlapursakal

पाली : रोटरी क्लब ऑफ बदलापूर मार्फत शुक्रवारी (ता.10) एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. अंध, दिव्यांग व विशेष मुलांना चक्क एक चित्रपट दाखविण्यात आला. 'यलो' हा एका विशेष मुलीच्या आयुष्यावर असलेला चित्रपट यावेळी दाखवण्यात आला. विशेष म्हणजे अंध मुलांना हा चित्रपट नुसता ऐकण्याऐवजी (मनःचक्शुनी) 'बघता' यावा यासाठी संस्थेने काही खास स्वयंसेवक बोलवले होते. हे स्वयंसेवक या अंध मुलांच्या बाजूला बसवून समोर चालू असलेल्या चित्रपटाच्या क्षण चित्रांचे जसेच्या तसे वर्णन या मुलांना समजेल अशा भाषेत सांगत होते. चित्रपटातील विविध पात्रांच्या कपड्यांच्या रंगापासून ते प्रसंगातील बारकाव्यांपर्यंत सर्वकाही या स्वयंसेवकांनी त्या मुलांना दाखवल्याने चित्रपट बघायला मिळाल्याचा आनंद अंध मुलांनी व्यक्त केला.

अशा स्वरुपाचा प्रयत्न हा पहिलाच प्रयत्न असल्याने रोटरी क्लब ऑफ बदलापुरचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व मुलांना चित्रपटाचा आनंद हा चित्रपट गृहासारखाच घेता यावा यासाठी पाॅपकाॅर्न, शीतपेय व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. घरकुल चे सस्थापक अविनाश बर्वे व संस्थेचे इतर सदस्य, अविरत सेवा प्रबोधीनीचे सुमीत देशपांडे तसेच रोटरी क्लब बदलापुरचे अनेक सदस्य या उपक्रमाला उपस्थित राहीले. पाणवठा या अपंग प्राण्यांच्या आश्रमाचे स्वयंसेवक तेजस भोईर, तन्मय चव्हाण, प्रसाद दळवी, गौरव दळवी, हेमश्वेता पांचाळ, निलम शीद, डॉ. अर्चना जैन यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. यासाठी अशुतोष कुलकर्णी यांनी रोटरी क्लबच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

शारिरीक अथवा मानसीक दृष्ट्या विशेष असलेल्या मुलांना त्यांच्यातील न्यूनगंडावर मात करुन आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यावा या हेतूने या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

- गणराज जैन, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ बदलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com