‘यीन बझ’चे उत्साहात स्वागत 

‘यीन बझ’चे उत्साहात स्वागत 

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चा (यीन) उपक्रम असलेल्या ‘यीन बझ’ पोर्टलचे रविवारी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बहारदार कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अन्नू मलिक यांनी अनावरण करताच उपस्थित तरुणाईने त्याचे जल्लोषात स्वागत केले. 

नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये हा सोहळा झाला. या पोर्टलच्या अनावरणाबाबत तरुणांमध्ये मोठी उत्सुकता होती. उपस्थितांमध्ये त्याचीच चर्चा होती. ज्येष्ठ संगीतकार अन्नू मलिक यांनी मोबाईलची कळ दाबल्यानंतर समोरील पडद्यावर ‘यीन बझ’चे पोर्टल दिसू लागताच तरुणाईने एकच जल्लोष केला. त्यानंतर या पोर्टलमध्ये काय काय असेल, याची माहिती पडद्यावर दिसू लागताच सर्व जण ती उत्सुकतेने पाहू लागले. काहींनी हातातील मोबाईलवर हे पोर्टल पाहण्याचा प्रयत्नही केला. मलिक यांनीही या वेळी ‘यीन’च्या सर्व उपक्रमांना तसेच ‘यीन बझ’ला शुभेच्छा दिल्या. 

‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक-संपादक श्रीराम पवार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, मुख्य संपादक राहुल गडपाले, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, वितरण उपमहाव्यवस्थापक (महाराष्ट्र) दिनेश शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव; तसेच ‘यीन बझ’चे संपादक संदीप काळे, अभिनेत्री अमृता राव, अभिनेता संतोष जुवेकर, अभिनव बेर्डे आणि हेमल इंगळे  या वेळी उपस्थित होते.  

‘यीन बझ’बाबत... 
    तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व समर्थ तरुण पिढी घडवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘यीन’ने राज्यभरातील महाविद्यालयांमधील २६ लाख विद्यार्थ्यांना जोडले आहे. 
    या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ देणारे ‘यीन बझ’ हे ऑनलाइन पोर्टल आहे. 
    या पोर्टलमध्ये तरुणांच्या विचार, मतांना व्यासपीठ मिळेल. 
    त्यांच्यासाठी ज्ञानाचे भांडार व मनोरंजनाचा खजिना खुला होईल. 
    अधिक माहितीसाठी भेट द्या ः www.yinbuzz.com 
    मोबाइल क्रमांक ः ७३५०६३००००
    ई-मेल  ः yinbuzzz@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com