मुंबईत यिन फेस्‍ट आजपासून

मुंबईत यिन फेस्‍ट आजपासून

मुंबई - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)च्या ‘यिन फेस्ट’ची सुरुवात डिझाईन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाने कोल्हापुरातून झाली आहे. याच शृंखलेंतर्गत मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयासमोरील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये ‘यिन टॉक’ हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये डिझाईनतज्ज्ञ निवेदिता साबू आणि ॲनिमेशनतज्ज्ञ ई. सुरेश तरुणाईशी संवाद साधतील.

‘एनएमआयएमएस’चे प्र-कुलगुरू डॉ. शरद वाय. म्हैसकर यांची या वेळी विशेष उपस्थिती असेल. संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला ‘यिन फेस्ट’ कोल्हापूरसह नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबादमध्ये होत आहे. 

विलेपार्लेनंतर ६ सप्टेंबरला खारघरमधील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सकाळी ११ वाजता  ‘यिन टॉक’ हा कार्यक्रम होईल. या वेळी डिझाईनतज्ज्ञ सतीश गोखले आणि रश्‍मी रानडे तरुणांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या कार्यक्रमांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) संचलित एनएमआयएमएस व्हेन्यू पार्टनर आहे.

विविध क्षेत्रात डिझाईन विचारांची गरज आहे. याच दृष्टीने संवादाचा कार्यक्रम तरुणांना प्रेरणादायी ठरेल. 

कार्यक्रमाचे  स्थळ
विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयासमोरील एनएमआयएमएस बिल्डिंगमधील, मुकेश पटेल ऑडिटोरियम.
वेळ - सकाळी ११ वा.
अधिक माहितीसाठी संपर्क - गणेश घोलप ८४५१८७१६६०,
बंदेनवाज ७७०९६०५४६७
     संयुक्त प्रायोजक - सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पुणे
     सहप्रायोजक - लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

आजचे मार्गदर्शक 
ॲनिमेशन पटांचे जादुगार ई. सुरेश
भारतीय ॲनिमेशन जगतात अमूल्य योगदान देणारे एक नाव म्हणजे ई. सुरेश अर्थात सुरेश ईरियात. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनमधून (एनआयडी) पदवीचे शिक्षण घेतलेल्या सुरेश यांनी आतापर्यंत ३५० चित्रपटांसाठी दिग्दर्शक आणि निर्मात्याची भूमिका पार पाडली. चित्रपटांसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. डिझाईन निर्मितीवर मनापासून प्रेम करणाऱ्या ई. सुरेश यांनी १९९८ मध्ये मुंबईत ॲनिमेशन स्टुडिओ उभारला. ‘एकेसॉरस’ या नावाने हा स्टुडिओ देशात प्रसिद्ध आहे. या स्टुडिओच्या उभारणीत त्यांना ग्राफिक डिझायनर असलेल्या त्यांच्या पत्नी निलिमा यांची साथ लाभली. भारतीयांसाठी ॲनिमेशन पटांचे नाविण्य असताना ई. सुरेश यांनी टू-डी, थ्री-डी पटांची निर्मिती करून माध्यम क्षेत्राला नवा आयाम दिला. ‘एकेसॉरस’ स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी ॲनिमेशन पटांमध्ये नवनव्या कल्पना साकारल्या. जाहिरात, संगीत क्षेत्रातही त्यांची कामगिरी भरीव आहे.


फॅशन डिझाईनमधील कल्पक निवेदिता
चित्रकलेची आवड असलेल्या निवेदिता साबू यांची कारकीर्द आता डिझाईन आणि फॅशन क्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. अचूकता, परिपूर्णता आणि कल्पकता यांचा योग्य संगम साधत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘निवेदिता साबू कल्चर’द्वारे दशकाहून अधिक काळ त्यांनी डिझाईन क्षेत्राला दिलेली ओळख दिलासादायी आहे. दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथून सुवर्णपदकासह पदवी पूर्ण केलेल्या निवेदिता यांचा प्रवास या क्षेत्रात समृद्धी आणणारा आहे. पॅरिस फॅशन विक, हाँगकाँग, लंडनपर्यंतचा त्यांचा डिझाईन क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळेच प्रमुख फॅशन डिझायनरमध्ये निवेदिता यांचे नाव आदराने घेतले जाते. रशियाची प्रसिद्ध मॉडेल मारिया शातालोव्हा, अमेरिकेतील कलाकार रुसोली, बॉलीवूड अभिनेत्री करिना, करिष्मा कपूर, दीपिका पदुकोण, विवेक ओबेरॉय यांच्या वस्त्रांवर निवेदिता यांची कल्पक कला नजरेत भरते ती त्यांच्या वेगळेपणामुळेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com