आंतरराष्ट्रीय योगाभ्यास दिन: बुधवारी सैनिकांच्या तोंडून फायर ऐवजी ऊँ शांती...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

एऱवी रोज सकाळपासून तोफा, बंदुका, रणगाडे यांच्या संगतीत फायर...फायर...अशा युद्धगर्जना देणारे वीर जवान उद्या सकाळी शांतपणे ऊँकारचा जप करीत योगासने करणार आहेत. 

मुंबई: एऱवी रोज सकाळपासून तोफा, बंदुका, रणगाडे यांच्या संगतीत फायर...फायर...अशा युद्धगर्जना देणारे वीर जवान उद्या सकाळी शांतपणे ऊँकारचा जप करीत योगासने करणार आहेत. 

 दक्षिण मुंबईतील नौदल गोदीत, कुलाब्याच्या सेनादल वसाहतीत तसेच उपनगरांमधील हवाईदल तळांवर सैनिक व अधिकारी योगाभ्यास करणार आहेत. नौदल गोदीत उभ्या असलेल्या जवळपास सर्वच युद्धनौकांच्या डेकवर पांढऱ्याशुभ्र गणवेशातील नौसैनिक व अधिकारी योगासने करणार आहेत. यातील मुख्य कार्यक्रम नौदलसेवेतून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट च्या विस्तीर्ण डेक वर होईल. येथे नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्याधिकारी व्हाईस अॅडमिरल गिरीष लुथ्रा यांच्यासह सुमारे एक हजार नौसेनिक सहभागी होतील. 

Web Title: Yoga day navy mumbai esakal news