दीड हजार लोकांचा एकत्र सूर्यनमस्कार

दीड हजार लोकांचा एकत्र सूर्यनमस्कार
दीड हजार लोकांचा एकत्र सूर्यनमस्कार

मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अंधेरीतील मॉडेल टाऊन रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनने ‘योगा विथ चेतना’ या योगा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात एकाच वेळी दीड हजार लोकांनी दोन तास सूर्यनमस्कार केले. चाचा नेहरू उद्यानात रविवारी सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई व परिसरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

योगा गुरू चेतना गंडेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वयोगटांतील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी सूर्यनमस्कार केले. यात एक अंध मुलगी तसेच पाच वर्षीय मुलापासून ८८ वर्षीय ज्येष्ठ महिलेचाही समावेश होता. या वेळी योगगुरू चेतना यांनी योगाचे शारीरिक व मानसिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. चेतना गंडेचा यांनी पूर्वी एकाच वेळी १००८ सूर्यनमस्कार केले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. या वेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्यासह अनेक मान्यवरदेखील उपस्थित होते.

आजारांपासून दूर राहावयाचे असल्यास दिवसातील रोज थोडा वेळ तरी प्रत्येकाने योगा करायला हवा. भारतात योगाचे संदर्भ फार प्राचीन आहेत.
आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनशैलीला योगाची जोड देणे अत्यंत आवश्‍यक आहे; अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्‍चात्तापाची वेळ येते. योगासोबतच आहार आणि विश्रांतीही तेवढीच आवश्‍यक असल्याचे चेतना गंडेचा यांनी सांगितले.

डहाणूतील महिलांची विक्रमी झेप
डहाणू पतंजली योग समितीच्या योगवर्गातील ११ महिलांनी या कार्यक्रमात १५१ सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम नोंदवला. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डहाणूतील या सर्व महिला ३६ ते ६० वर्षे या वयोगटातील असूनसुद्धा त्यांनी हे अवघड कार्य पूर्ण केले. पूजा चौधरी, दर्शना वोरा, मनीषा राणे, रत्नमाला कोळी, अर्चना ओक, आशा मोरे, सविता खडांगळे, लीना चौधरी, माधुरी पाटील, चंद्रिका तांडेल, निशा बनिया या ११ महिलांनी हा विक्रम केला.

महत्त्वाची बातमी : सोन्याची झळाळी उतरली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com