योगेश सोमण रजेवर की सक्तीच्या रजेवर ? पुन्हा वाद उफाळणार?

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 January 2020

विद्यापीठाच्या दुटप्पी भुमिकेने पुन्हा वाद उफाळण्याची शक्‍यता 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या विद्यार्थ्यांनी कलिना कॅम्पसमध्ये सोमवारी (ता.13) आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाने संचालक योगेश सोमण यांना तातडीने रजेवर पाठविण्यात येईल असे पत्र विद्यार्थ्यांना दिले. यावरून राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर विद्यापीठाने तीन दिवसांनंतर पुन्हा भूमिका बदलली असून सोमण हे 13 जानेवारीपासून रजेवर असल्याचे पत्र कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

मोठी बातमी - दाऊदला तुडवणारा 'करीम लाला' होता तरी कोण?

सोमण यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याप्रकरणी संचालकांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अखेर रात्री बारा वाजणेच्या सुमारास विद्यापीठाने विद्यार्थ्यांना लेखी पत्र दिले. या पत्रात सोमण यांना तात्काळ रजेवर पाठविण्यात येत आहे. असे स्पष्टपणे म्हटले आहे. 

No photo description available.

 

Image may contain: text

मोठी बातमी -  त्या 'लकी' कॉईनने दिला एजाज लकडवालाला पुनर्जन्म; वाचा नक्की काय घडले

सोमण यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आल्याचे समजताच भाजपा आमदार अशिष शेलार यांनी या कारवाईला आक्षेप घेतला. यावरून राजकारण तापले असतानाच गुरूवारी (ता.16) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमण यांच्यावरील कारवाई राजकीय दबावातून झाल्याने ती रद्द करण्याची मागणी केली. यावर कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी सोमण हे 13 जानेवारीपासून रजेवर आहेत. त्यांचे रजेचा अर्ज मंजूर करण्यात आला असल्याचे, लेखी पत्र अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेवरून पुन्हा वाद उफाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
याबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क करण्यात आला. परंतू त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

yogesh soman is on leave or compulsory leave stand of mumbai university is questioned 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yogesh soman is on leave or compulsory leave stand of mumbai university is questioned