डोंबिवलीतील तरुण उद्योजकाने उभारले 'स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा'

संजीत वायंगणकर
रविवार, 29 एप्रिल 2018

छोट्या शहरातील तरुणांना उद्योजकीय प्रवास कळावा, तज्ञ आनुभवी  ज्ञान तरुणांना मिळावे या हेतूने डोंबिवलीतील तरुण कुणाल गडहिरे याने महाराष्ट्रात ही चळवळ सुरु केली आहे.

डोंबिवली - मराठी मातीतील गुणवत्ता वाखाणण्याजोगी उल्लेखनीय आहे. परंतू ही गुणवत्ता नोकरी करुन इतर कुणाचा फायदा करण्यासाठी वाया न जाता मराठी तरुणांना स्टार्ट अप संबंधात मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या डोंबिवलीकर कुणाला गडहिरे याने चंग बांधला आहे.

छोट्या शहरातील तरुणांना उद्योजकीय प्रवास कळावा, तज्ञ आनुभवी  ज्ञान तरुणांना मिळावे या हेतून डोंबिवलीतील तरुण कुणाल गडहिरे याने महाराष्ट्रात ही चळवळ सुरु केली आहे. तरुण नवउद्योजकांना स्टार्टअप या विषयासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे आणि स्टार्टअप इकोसिस्टम संपूर्ण राज्यात तयार व्हावी यासाठी कुणालच्या “ स्किलसीखो डॉट कॉमने मेंटॉरप्रेन्युअर्सच्या सहकार्याने 'स्टार्टअप महाराष्ट्र यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील होतकरु तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणारी दहा शहरात भरणारी ही पहिलीच विनामूल्य कार्यशाळा असणार आहे. 

एकूण दोन टप्प्यांमध्ये स्टार्टअप महाराष्ट्र यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 एप्रिल रोजी ठाणे, 05 मे रोजी चिपळूण, 12 मे औरंगाबाद, 17 मे नाशिक तर 26 मे जळगाव आणि या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे, नागपूर, अमरावती, सांगली, कोल्हापूर येथे आयोजन केले जाणार आहे. भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित स्टार्टअप उदयोजक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. यात सहभागी नव उद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.पिच युअर स्टार्टअप या स्पर्धेच्या माध्यमातून, व्यावसायिक गुंतवणूकदारांकडून, विजेत्या स्टार्टअप्सना ५० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मिळवण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  एक हजार हुन अधिक विद्यार्थी आणि पाच हजार हुन अधिक उद्योजक या यात्रेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. स्टार्टअप या विषयातील मार्गदर्शन, रिसोर्सेस, इन्क्युबेटर, असलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबंधित विविध कार्यक्रम, फंडिंग मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस, आणि स्टार्टअप इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सनां मिळणारे फायदे हे सर्वच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या एका विशिष्ट वर्गापर्यंत आजवर मर्यादित आहेत. हि परिस्थिती बदलणे आणि महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये स्टार्ट अप इकोसिस्टम रुजवणे हे या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे ध्येय आहे.  महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये, स्टार्ट अप महाराष्ट्र यात्रा अंतर्गत कार्यक्रमांचे व मोफत कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. निवडक होतकरू स्टार्ट अप उद्योजकांना वैयक्तिकरित्या, तज्ज्ञ व्यावसायिकांकडून त्यांच्या स्टार्ट अप साठी मार्गदर्शन, ‘पिच युअर स्टार्ट अप’ या स्पर्धेच्या माध्यमातून, निवडक होतकरू स्टार्ट अप उद्योजकांना, गुंतवणूक मिळवण्यासाठी इन्व्हेस्टर्स समोर त्यांच्या स्टार्ट अपचे प्रेझेंटेशन करण्याची संधी, विविध क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योजकांशी नेटवर्किंग, स्किलसीखो डॉट कॉमने सुरु केलेल्या मराठी भाषेतील ऑनलाईन इन्क्युबेशन कोर्सच्या माध्यमातून नव उद्योजकांना स्टार्टअप या विषयात ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असल्यामुळे कार्यक्रमात विनामूल्य रजिस्टर करून प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.startupyatra.skillsikho.com या संकेत स्थळावर अथवा 9870869651 या क्रमांकावर संपर्क करता येईल किंवा अर्चना - 81081052298 वर संपर्क करुन सविस्तर माहिती घेता येईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Young entrepreneur in Dombivli