युवा पिढीसाठी वरळीत रंगणार ‘क्‍लासिकूल’ संगीत मैफील

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - युवा पिढीला शास्त्रीय संगीताचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘क्‍लासिकूल’ ही शास्त्रीय फ्युजन संगीत रजनी होणार आहे. ही मैफील शुक्रवारी (ता. १८) वरळीतील नेहरू सेंटरमध्ये संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन सहभागी होणार आहेत.

‘क्‍लासिकूल’ कार्यक्रमात पुर्बयान चॅटर्जी (सतार), जीनो बॅंक्‍स (ड्रम्स), सत्यजित तळवलकर (तबला), स्टीफन देवासी (की-बोर्ड), शेल्डन डिसिल्व्हा (बास गिटार), गायत्री अशोकन (गायन), ऱ्हिदम शॉ (गिटार) व श्रीधर पार्थसार्थी (मृदंगम) हे कलाकार कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन द इव्हेंट कंपनी व जिंजर पीआर यांनी केले आहे. 

या कार्यक्रमात गाण्यासाठी शंकर महादेवन खूपच उत्सुक असून, ते म्हणाले, की ‘क्‍लासिकूल’मध्ये गाण्यासाठी मी आतुर आहे. यात सहभागी होणारे कलाकार देशातील काही उत्तम कलाकारांमधील आहेत. कित्येक वर्षे मी शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांची योग्य सांगड घालत शास्त्रीय संगीत जोपासण्याचे काम करीत आलो आहे. त्यामुळे नव्या दमाच्या संगीतकारांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी मी आतुर आहे. ‘क्‍लासिकूल’ कार्यक्रमाची तिकिटे www.bookmyshow.com वरही मिळणार आहेत.

Web Title: The young generation classicool music maiphil