ठाणे ः वाग्दत्त वधूसह येऊरला पार्टीला गेलेल्या तरुणाला त्रिकुटाने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उथळसर येथे राहणारा करण भोईर हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीला घेऊन येऊर येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता.
तेव्हा, जेवण करून परतताना त्याच हॉटेलात आलेल्या तिघा तरुणांपैकी एकाने करणच्या मैत्रिणीकडे मोबाईल नंबर मागितला. याचा जाब करणने त्या तरुणाला विचारल्याने वाद उद्भवून तिघा तरुणांनी करण व त्याची मैत्रीण आणि करणच्या मित्राला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एकाचे नाव मोनीश असे असून तिघंही तरुण कारमधून पळून गेले. अशी तक्रार करण याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.