महिला पोलिसाच्या दुचाकीला धडकून तरुणाचा मृत्यू 

महिला पोलिसाच्या दुचाकीला धडकून तरुणाचा मृत्यू 

भिवंडी : पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवरून आलेला महाविद्यालयीन युवक महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडकून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रांजणोली चौक बायपास नाका येथे शनिवारी (ता. 9) सकाळी घडली.

या अपघातात महिला पोलिस कॉन्स्टेबलदेखील गंभीर जखमी झाली आहे. राजिक खान (21, रा. गैबीनगर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे; तर मनीषा तनपुरे (31, रा. शिवाईनगर, ठाणे) असे जखमी महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. तनपुरे या भिवंडीतील निजामपूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. त्या ठाण्याहून दुचाकीने येत असताना कल्याण रोड रांजणोली चौक बायपास नाका येथे राजिक हादेखील ठाण्याहून भिवंडीकडे घराच्या दिशेने येत होता. मात्र पाऊस पडत असल्याने रस्ता निसरडा होता. त्यामुळे राजिकची भरधाव दुचाकी घसरून मनीषा तनपुरे यांच्या दुचाकीला घासून रस्त्याकडेच्या फलकावर जाऊन आदळली.

या वेळी फलकाचे लोखंडी खिळे राजिक याच्या मानेत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर तनपुरे यांच्या डाव्या हातास व डाव्या घोट्यास जबर मार लागला. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

web title : Young man dies after hitting police bike

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com