रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरूणाने गमावला जीव

रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरूणाने गमावला जीव

शहापूरः रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना लिबर्टी ऑईल मिल कंपनीजवळ आज घडली. खड्ड्यात दुचाकी आदळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

विशाल भरत विशे असे मृत तरुणाचे नाव असून तो तालुक्‍यातील साठगाव येथील राहणारा आहे. इंजिनिअर असलेला विशाल डोंबिवली येथे नोकरीला होता. दररोज साठगाव येथून आसनगाव येथे आपल्या दुचाकीवर जावे लागत असल्याने नेहमीप्रमाणे आज तो घरून निघाला; मात्र लिबर्टी ऑईल मिल कंपनीजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी जोरदार आदळली व तो रस्त्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या विशालला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर ठाणे येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहापूर पोलिस करीत आहेत. दरम्यान, विशालच्या नातेवाईकांनी संबंधित रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com