सलोनमध्ये तरुणीचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

गिरगाव येथील सलोनमध्ये 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला.

मुंबई : गिरगाव येथील सलोनमध्ये 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सलोनच्या कर्मचाऱ्याला व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली. अल्ताफ रहिश सलमानी (19) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पीडित तरुणी गिरगाव येथील सलोनमध्ये हेअर स्पा, हेअर कलर व वॅक्‍सिंगसाठी आली होती. पीडित तरुणी बुधवारी सलोनमध्ये गेली होती. हेअर स्पा झाल्यानंतर केस धुण्याच्या नावाखाली आरोपीने पीडित मुलीच्या टी-शर्टच्या मागच्या बाजूस पाणी ओतले.

त्यानंतर आरोपीने पाठीमागे टाकलेला टॉवेल काढण्याच्या बहाण्याने टी-शर्ट वर केला व अश्‍लील चाळे केल्यामुळे अखेर पीडित तरुणीने या प्रकरणानंतर घाबरल्यामुळे कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman modesty in the salon