हत्येप्रकरणी तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - भायखळ्यातील राणी बाग परिसरातील ई. एस. पठाणवाला रोडवरील महापालिकेच्या पे अॅण्ड पार्किंगकरिता काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची रविवारी (ता. १) सायंकाळी दोन दुचाकीस्वारांनी किरकोळ वादातून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी सोमवारी शिवडीतून शेहजाद उमर शेख (वय १९) याला अटक केली. घटनेतील आरोपी माझगावमध्ये राहणारा आहे. त्याने केलेल्या मारहाणीत भावेश कोळी याचा मृत्यू झाला होता. त्याच्यासोबतचे इतर दोघे जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेहजादला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

Web Title: Youth arrested for murder