सी लिंकवरून आत्महत्या

सी लिंकवरून आत्महत्या

मुंबई - सागरी सेतूवर वरळी येथे टॅक्‍सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) हा तरुण शुक्रवारी (ता. १२) दुपारी टॅक्‍सीने सी-लिंकवरून प्रवास करत होता. समुद्र खवळलेला असल्यामुळे हेलिकॉप्टरमधून त्याचा शोध घेतला असताना रात्री साडेआठ वाजता बॅण्‍डस्‍टॅण्‍ड येथे त्‍याचा मृतदेह आढळून आला आहे. 

शुक्रवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास वरळीकडून वांद्य्राकडे जात असताना पार्थ सोमाणी याने सागरी सेतूवर टॅक्‍सी थांबवण्यास चालकाला सांगितले. खांब क्र. ५२ जवळ टॅक्‍सी थांबताच त्याने समुद्रात उडी मारली. या घटनेमुळे घाबरलेल्या टॅक्‍सीचालकाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तटरक्षक दलाला कळवले. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्याचा शोध सुरू करण्यात आला. 

पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने बोटींमधून शोधकार्य सुरू ठेवणे कठीण झाले. त्यामुळे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमधून शोधमोहीम राबवण्यात येत होती. वरळी कोळीवाडा, शिवाजी पार्कच्या दिशेने समुद्रावर हेलिकॉप्टर गस्त घालत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी टॅक्‍सीचालकाचा जबाब नोंदवला आहे. सीसी टीव्ही चित्रीकरणातही हा तरुण सी-लिंकवरून समुद्रात उडी मारत असताना दिसतो; मात्र पाण्यात पडल्यानंतर काही वेळाने तो दिसत नव्हता. 

मुलुंड येथील रहिवासी असलेला पार्थ सोमाणी एका सनदी लेखापालाकडे नोकरी करत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही मानसिक धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com