वरळी सी-लिंकवरून उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

वरळी सी-लिंकवरून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. संबंधित तरुण टॅक्सीने जात असताना टॅक्सी थांबवून त्याने हे कृत्य केले आहे. पार्थ सोमाणी असे या तरुणाचे नाव आहे.

मुंबई : वरळी सी-लिंकवरून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. संबंधित तरुण टॅक्सीने जात असताना टॅक्सी थांबवून त्याने हे कृत्य केले आहे. पार्थ सोमाणी असे या तरुणाचे नाव आहे.

पार्थ सोमाणी हा मुलुंड येथील रहिवासी असून, चार्टर्ड अकाऊंटंटकडे नोकरी करत होता. पार्थ दुपारी सव्वाएकच्या सुमारास वरळीकडून वांद्रे येथे टॅक्सीने जात असताना त्याने टॅक्सी सी-लिंकवर थांबविण्यास सांगितली होती. त्यानंतर त्याने समुद्रात उडी मारली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

दरम्यान, पार्थचा मृतदेह अद्याप सापडला नसून, अग्निशमन दलाचे जवान आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधकार्य केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Youth Committed suicide by jumping from Worli Sea Link