धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

डोंबिवली : सर्वात गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. धनश्री गोडवे आणि भावेश नकाते या दोघा डोंबिवलीकरांचा लोकलमधील गर्दीने यापूर्वी बळी घेतला होता. आता नवीन वर्षात ही हे मृत्यूचे सत्र सुरु असून, आज (बुधवार) पुन्हा लोकलमधील गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. 

नितेंद्र विरेंद्र यादव (वय-20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. नितेंद्र हा डोंबिवलीतील गोग्रासवाडी येथे राहत होता. डोंबिवली स्थानकातून सकाळी साडेनऊ वाजता फलाट क्रमांक 5 वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तो चढला. मात्र, लोकलमधील गर्दीमुळे त्याला आत शिरता आले नाही. त्यामुळे डोंबिवली कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गर्दीमुळे तो बाहेर फेकला गेला. यात खाली पडून नितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती इतर प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com