नॅशनल पार्कात युवकाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : बोरिवली पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दहिसर नदीत युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 11) दुपारी घडली. अय्याज शेख (20) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. 
अय्याज हा बोरिवली पूर्वच्या कार्टर रोड परिसरात राहत होता. सोमवारी दुपारी तो भावासोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आला होता. उद्यानातील दहिसर नदी पात्रात भिंतीचे बांधकाम सुरू होते.

बांधकामादरम्यान नदीतून गाळ नुकताच काढण्यात आला होता. गाळ काढळल्यामुळे नदीची खोली वाढली. भावासोबत पोहत असताना अय्याजला पाण्याचा अंदाज आला नाही. अय्याज बुडत असताना त्याच्या भावाने या प्रकाराची माहिती वनाधिकाऱ्यांना कळवली. काही वेळात वनाधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी अय्याजला बाहेर काढले. त्याला उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी अय्याजला मृत घोषित केले. 

Web Title: The youth drowned in the National Park