तरुणांनो, चला भुतांचे भांडे फोडूया!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

गटारी अमावास्येनिमित्त येत्या बुधवारी (ता. ३१) विद्यार्थी भारती संघटनेतर्फे कल्याण पश्‍चिमेतील बापगाव येथील नांदकर समशानभूमीमध्ये रात्री १० वाजता ‘एक रात्र भुतांची’ या एकरात्रीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दर वर्षी अशी सहल आयोजित केली जाते. यामार्फत ‘चला भुतांचे भांडे फोडूया’ असे आवाहन तरुणांना विद्यार्थी संघटनेने केले आहे.

मुंबई - गटारी अमावास्येनिमित्त येत्या बुधवारी (ता. ३१) विद्यार्थी भारती संघटनेतर्फे कल्याण पश्‍चिमेतील बापगाव येथील नांदकर समशानभूमीमध्ये रात्री १० वाजता ‘एक रात्र भुतांची’ या एकरात्रीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दर वर्षी अशी सहल आयोजित केली जाते. यामार्फत ‘चला भुतांचे भांडे फोडूया’ असे आवाहन तरुणांना विद्यार्थी संघटनेने केले आहे.

अंधश्रद्धेची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला रोज पाहत असतो. ते आपल्याला पटतही नाही. तरीही काहीही न बोलता आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, असे संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सर्वेश लवांडे यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकार थांबत नाही. या उपक्रमाद्वारे आम्ही नवजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नावनोंदणी करून कोणीही पिकनिकमध्ये सहभागी होऊ शकता, असे विद्यार्थी भारती संघटनेच्या मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आरती गुप्ता यांनी सांगितले. 
नाव नोंदणीसाठी ८०९७८३४१६७ किंवा ८४०८०१९७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. अमावास्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असे आपण ऐकत असतो. त्यामुळे अमावास्येच्या रात्रीच स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तेथे काढणार आणि भुतांनी आम्हाला भेटायला यावे, यासाठी ‘भुता भुता ये रे, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे,’ अशा मुलांनी तयार केलेल्या गाण्यांमार्फत भुतांना आव्हान देण्यात येणार असल्याचे सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Ghost Gatari Amavasya